सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; दिल्लीत रुग्णालयात दाखल

0
187
Sonia Gandhi Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात डॉक्टरांकडून सध्या उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोनिया गांधी यांची तब्येत गुरुवारपासून बिघडली होती. गुरुवारी त्यांना ताप आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर आणि नर्सेसच्या देखरेखीखाली त्यांना सध्या ठेवण्यात आले आहे. तसेच सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय चाचण्याही केल्या जात आहेत.

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. कालच त्यांना इथे दाखल करण्यात आले. आज हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून या संदर्भात हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले. सोनिया गांधी यांच्यावर चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटचे सीनियर कन्सल्टंट डॉ. अरुप बासु यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात आले आहे.