विशेष प्रतिनिधी । संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरु झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल आहेत. राज्यात अजूनही सत्ताकोंडी कायम आहे. अशा परिस्थिती पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टिने याभेटीकडे सर्वांचे लागून होते. मात्र, याभेटीत शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल चर्चाच झाली नसल्याचे पवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची कोंडी तर झाली नाही न असा सवाल उपस्थित झाला आहे.
पत्रकारांना याभेतील मुद्दे सांगत पवार म्हणाले कि,’महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अवगत करून देण्यासाठी मी सोनिया यांची भेट घेतली. सरकार स्थापनेबाबत आम्ही काही बोललो नाही तसेच फक्त राज्यातील स्थितीवर लक्ष ठेऊ यावर आमचं एकमत झालं.’ त्याचबरोबर किमान सामान कार्यक्रम याबाबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही. आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल त्यानंतर पुढील निर्णय होईल असेही पवार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, तुम्ही शिवसेनेसोबत जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आम्ही तर सर्वांसोबत आहोत असं मिश्कीलपणे उत्तर पवार यांनी दिले. तसेच आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढणाऱ्या मित्रपक्ष सरकारस्थापनेबाबत नाराज आहेत. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करूनच काय तो निर्णय होईल. असंही पवार म्हणाले. पवार यांच्या उत्तरांनी राज्यातील सत्ताकोंडी अजून तरी फुटणार नाही याचे संकेत सध्यातरी मिळत आहेत. मात्र, पवार-सोनिया भेटीत सत्तास्थापनेबाबत चर्चाच न झाल्याची माहिती समोर आल्याने शिवसेनेची आता कोंडी झाल्याचे बोललं जात आहे.