कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

कराड नगरपालिकेच्या नगरसेवकांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पाठिंबा दिला आहे. या सर्व नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

२०१४ च्या निवडणुकीत राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे समर्थक नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी होते. आता शहराच्या विकासासाठी भाजपसोबत जात असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राजेंद्रसिंह यादव आणि इतर नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपची ताकद वाढली असून विधानसभेला विजय नक्की झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंनी दिली आहे.

इतर काही बातम्या-