हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता 6 मार्च 2023 पासून केंद्र सरकार कडून स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकदारांना 10 मार्च 2023 पर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत गुंतवणूक करते येईल. सॉव्हरेन गोल्ड बाँड 2022-23 ची चौथी सिरीज 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी उघडली जाईल.
पाच दिवसांसाठी सुरु राहणाऱ्या या गोल्ड बाँडची किंमत 5,611 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी RBI कडून एका निवेदनात सांगण्यात आले की, 2022-23 च्या चौथ्या सिरीज अंतर्गत 6 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीमध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना खरेदीसाठी उपलब्ध असेल.
ऑनलाइन खरेदीवर प्रति ग्रॅम मिळेल 50 रुपयांची सूट
हे लक्षात घ्या कि, Sovereign Gold Bond साठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन पेमेंट करावे लागेल. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू प्राईस 5,359 रुपये प्रति ग्रॅम असेल.
Sovereign Gold Bond कसे खरेदी करावे ???
Sovereign Gold Bond ची विक्री शेड्यूल्ड कमर्शिअल बँका (स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळून), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., डेजिग्नेटेड पोस्ट ऑफिसेस, NSE आणि BSE) द्वारे केली जाईल.
किती व्याज मिळेल ???
सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्ष आहे. तसेच 5 व्या वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय देखील मिळेल. एका निवेदनानुसार, गुंतवणूकदारांना अर्धवार्षिक आधारावर फेस व्हॅल्यूवर 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळेल.
जास्तीत जास्त किती बॉण्ड्स खरेदी करता येतील ???
या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो आणि कमीत कमी किमान एक ग्रॅमचे गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. त्याच वेळी, ट्रस्ट किंवा त्यासारख्या संस्थांना 20 किलोपर्यंतचे गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
BSNL चा ‘हा’ प्लॅन खूपच फायदेशीर, पण रिचार्ज करावा की नाही ते जाणून घ्या
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
खुशखबर !!! आता Canara Bank च्या ग्राहकांना आता क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया