हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond योजनेअंतर्गत स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) योजनेच्या दुसऱ्या सीरिजचे सब्सक्रिप्शन 22 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत सुरु होते. आज पाचव्या दिवशी ते बंद होईल. हे लक्षात घ्या कि, फक्त 5,197 रुपयांची गुंतवणूक करून सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येतो.
याबाबत RBI ने सांगितले की, सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स 2022-23 ची दुसरी सीरिज 22 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्जासाठी उपलब्ध असेल. 2021-22 या गेल्या आर्थिक वर्षामध्ये एकूण 12,991 कोटी रुपयांच्या 10 हप्त्यांमध्ये SGBs जारी करण्यात आले होते.
ऑनलाइन खरेदीवर मिळेल 50 रुपये प्रति ग्रॅम सूट
डिजीटल माध्यमातून Sovereign Gold Bond साठी अर्ज करणार्या आणि पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांसाठी इश्यूची प्राईस 50 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 5,047 रुपये प्रति ग्रॅमने कमी होईल. यामध्ये गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल, असे RBIकडून सांगण्यात आले आहे.
सरकारच्या वतीने RBI कडून Sovereign Gold Bond जारी केले जातात
नोव्हेंबर 2015 मध्ये सरकारकडून Sovereign Gold Bond योजना सुरू करण्यात आली होती. सरकारच्या वतीने RBI कडून Sovereign Gold Bond जारी केले जातात. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात.
कमीत कमी एक ग्रॅम गुंतवणूक करावी लागेल
Sovereign Gold Bond योजनेत कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. यामधील किमान गुंतवणूक एक ग्रॅम असेल. तर, ट्रस्ट किंवा तत्सम संस्थाना 20 किलोपर्यंतचे बॉण्ड्स खरेदी करता येतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!
Share Market : गेल्या आठवड्यात टॉप 10 पैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!