नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येला उपाय म्हणून लसीकरण महत्वाचे उत्तर डोळ्यासमोर येते. संपूर्ण देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मात्र आताच्या परिस्थितीनुसार अनेक राज्यातील लसीकरण मोहीम ठप्प झाल्या आहेत. मात्र काँग्रेस ‘स्पीकअप फोर वेक्सिन फॉर ऑल’ ही नवी मोहीम सुरू केली आहे. याबाबतची माहिती. काँग्रेस नेते प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. त्यांनी दिलेल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1381469089122590720?s=20
काय आहे स्पीकअप फॉर वेक्सिन फॉर ऑल’ मोहीम
देशातील लसीकरणा संबंधी ची माहिती देणारा व्हिडिओ कांग्रेस द्वारा शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये देशातील लसीकरणाची परिस्थिती बिकट असल्याचे दर्शवत आहे. तसेच देशातून कोरोना लसीची निर्यात थांबावी. लसी असून देखील केंद्र सरकार लसीकरण करण्यात मागे पडले आहे असे सांगण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व सामान्य माणसांनी यात सोशल मीडियाद्वारे आपले मत व्यक्त करीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम 12 एप्रिल पासून सुरु होत असून यात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस द्वारे करण्यात आले आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1381457365057277953?s=20
याबाबत से ट्विट करताना प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
‘कारण लोकांसाठी लस घोटाळा होऊ नये,कारण सरकारने कार्यक्रमापेक्षा लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कारण पीएम केअरच्या नावावर जमा झालेला निधी कोठे खर्च होतो हे जाणून घेण्याचा सर्वांनाच अधिकार आहे.
कारण लस पाठवण्याऐवजी सरकारने प्रत्येक भारतीयांना ही लस देण्यावर भर दिला पाहिजे’ अशा आशयाचे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा