हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. यादरम्यन अनेक बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक बँका मर्यादित कालावधीसाठी FD वर खास ऑफर देखील देत आहेत.
हे लक्षात घ्या कि, देशातील अनेक मोठ्या बँकांकडून एफडीसाठी स्पेशल दर दिले जात आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय यासारख्या बँकांचा समावेश आहे. याशिवाय एचडीएफसी, पीएनबी आणि एक्सिससहीत अनेक बँकांनी देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. चला तर मग कोणती बँक FD वर किती व्याज देत आहे ते पाहूयात…
SBI
SBI कडून 75 दिवसांची उत्सव डिपॉझिट स्कीम सुरू करण्यात आली आहे जी 30 ऑक्टोबरपर्यंत सुरु असेल. या अंतर्गत बँकेकडून सामान्य नागरिकांना 6.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के व्याज दिले जाईल. FD Rates
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाने तिरंगा डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. या अंतर्गत 44 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज दिले जाईल. त्याचबरोबर 555 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के व्याज दिले जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, 31 डिसेंबरपर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्ससाठी ही योजना व्हॅलिड असेल. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाणार आहे. याशिवाय कॅनरा बँक देखील 666 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, पंजाब नॅशनल बँकेकडून 1,111 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज दिले जात आहे. FD Rates
इतर खासगी बँकादेखील देत आहेत खास दर
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC Bank कडून 5 वर्ष 10 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, ICICI Bank त्याच कालावधीच्या FD वर 5.75 टक्के व्याज देत आहे. तर एक्सिस बँक 17-18 महिन्यांच्या एफडीवर 6.05 टक्के व्याज देत आहे. FD Rates
RBI कडून 4 महिन्यांमध्ये 3 वेळा रेपो रेट वाढवण्यात आला
मे ते ऑगस्ट या कालावधीत RBI कडून रेपो दरात 140 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. RBI ने ऑगस्टमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. सध्या रेपो दर 5.40 टक्के आहे. सध्या वाढत चाललेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/deposit-rates/retail-domestic-term-deposits
हे पण वाचा :
RBI ने पेमेंट सिस्टीममधील शुल्कांबाबत जनतेकडून मागितला फिडबॅक !!!
Bank FD : ‘या’ मोठ्या बँकांनी वाढवले FD वरील व्याजदर !!!
HDFC Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा