हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरत आहे. जर आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आपल्या खिशात पैसे असो वा नसो त्याने काहीही फरक पडत नाही. मात्र याद्वारे खर्च करताना अनेकदा किती खर्च करावा हे लक्षातच येत नाही. मात्र आपल्याला हे माहित आहे का ??? आपल्याकडून करण्यात येणाऱ्या क्रेडिट कार्डच्या खर्चावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून लक्ष ठेवले जाते.
RBI च्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये ई-कॉमर्स वेबसाइटवर Credit Card द्वारे खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत जवळपास चार पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर पॉईंट ऑफ सेल (PoS) वर देखील डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्डद्वारे खरेदीची संख्या 1.2 पटींनी वाढली आहे. मात्र इथे हे ध्यानात घ्या कि, याद्वारे खरेदी करणे सोपे झाले असले तरीही अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केल्याने आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत येऊ शकतो.
क्रेडिट कार्डद्वारे खरेदीचा नियम जाणून घ्या
Credit Card द्वारे खरेदीसाठी कोणतेही विशिष्ट असे नियम नाहीत. मात्र बँका आणि वित्तीय संस्थांना कोणत्याही उच्च मूल्याच्या ट्रान्सझॅक्शनची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणे बंधनकारक आहे. कारण इन्कम टॅक्स नियमांनुसार, फॉर्म 61A द्वारे बँकांना 10 लाखांपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शनचे रिपोर्ट डिपार्टमेंटला द्यावे लागतात. इतकेच नाही तर कोणत्याही व्यक्तीच्या क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या खर्चाची आणि उच्च मूल्याच्या ट्रान्सझॅक्शनची माहिती देखील फॉर्म 26A च्या माध्यमातून बँकांना डिपार्टमेंटला द्यावी लागते.
कोणत्या परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्स नोटीस मिळेल ???
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, जर एखादा ग्राहक प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे Credit Card बिल भरत असेल तर त्याला तपासणीला सामोरे जावे लागू शकते. विशेषत: जर ग्राहक रोखीने बिल जमा करत असेल तर डिपार्टमेंटकडून त्याला याबाबत नोटीस देखील मिळू शकेल.
बँकांकडून दरवर्षी दिली जाते माहिती
हे जाणून घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून बँका, कंपन्या, रजिस्ट्रार आणि पोस्ट ऑफिसेसना दरवर्षी फॉर्म 61A द्वारे क्रेडिट कार्ड ट्रान्सझॅक्शनबाबत रिपोर्ट करण्यास सांगितले गेले आहे. ज्यामध्ये आर्थिक ट्रान्सझॅक्शनचे संपूर्ण स्टेटमेंट देखील असते. इतकेच नाही तर करदात्यांना त्यांच्या ट्रान्सझॅक्शन बाबतची सर्व माहिती देखील फॉर्म 26AS मध्ये द्यावी लागेल. ज्यामध्ये Credit Card द्वारे करण्यात आलेल्या ट्रान्सझॅक्शनचाही समावेश करावा लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
PhonePe ने सुरु केली आधार कार्डद्वारे UPI रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा !!!
Budget Cars : कार घेताय… जरा थांबा, ‘या’ बजट कारचे फीचर्स अन् किंमत तपासा
गेल्या 5 वर्षांत ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना दिला 573% रिटर्न
BSNL च्या 107 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 84 दिवसांची व्हॅलिडिटी
Income Tax Department कडून पॅन कार्डधारकांना इशारा, लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम