दहावीच्या निकालाची वेबसाईट पाच तासानंतर झाली धिम्यागतीने सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. ती सुरु करण्यात तत्ज्ञांना यश आलं असून आता हि वेबसाईट पुन्हा पाच तासानंतर काही ठिकाणी धिम्या गतीने सुरु झाली आहे. मात्र, देण्यात आलेल्या वेबसाईटच्या संकेतस्थळावर गेल्यास काही ठिकाणी ती सुरु होत आहे तर काही ठिकाणी ती बंद पडत आहे.

दहावीतील विध्यार्थ्यानी एकाच वेळी वेबसाईट वर लॉगिन केल्यामुळे ती साईट च हँग झाली होती. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in वर निकाल उपलब्ध होणार आहे परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, तब्बल पाच तासानंतर आता काही ठिकाणी वेबसाईट सुरु झाली आहे.

राजराज्यातील महत्वाच्या असणाऱ्या दहावी परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अधिकृत वेबसाईटही देण्यात आलीय. मात्र, त्या वेबसाईटवरजास्त संख्येने विध्यार्थ्यानी निकाल पाहू लागल्याने हि वेबसाईट हँग झाली होती.