व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ST बस व डंपरची समोरासमोर धडक; 7 जण जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पांचगणी – वाई मुख्य मार्गावर शेरबाग जवळ ST बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 7 जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पांचगणीहून वाईकडे जाणारी रोहा – सातारा (बस क्रमांक एम एच १४ बी टी ४९१७ ) ही निमआराम बस शेरबाग जवळ उतारावर आली असता नुकत्याच पडलेल्या पावसाने घसरड्या रस्त्यावरून घसरून वाईहून पांचगणी कडे येणारा डंपर (क्रमांक एम एच ११ सी जे ६२४७ ) यावर समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच बसमधील २९ प्रवाशांपैकी 6-7 प्रवासी जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने घटनास्थळी दाखल झाले तर एस ओ एस टीमचे सर्व सदस्य या ठिकाणी मदतीसाठी धावून आले. जखमींना उपचारासाठी बेल एअर व पांचगणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. तर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघाताने दोन्ही वाहने जागेवरच रस्त्यात उभी असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पोलिसांना ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.