हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. मात्र एसटी चे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन केले आहे.
एसटी हि सर्वसामान्य माणसाची आणि ग्रामीण लोकांची गरज आहे. मी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना आव्हान करतो कि त्यांनी ताबडतोब कामावर यावे असे अनिल परब यांनी म्हंटल. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे किंवा ज्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कामगारांची रोजी रोटी जाणार नाही याची काळजी सरकार घेईल. अशी ग्वाही अनिल परब यांनी दिली
तरीही एवढं सर्व काही सांगूनही कामगार कामावर आपले नाहीत तर आम्ही असे समजू कि त्यांना नोकरीची गरज नाही आणि मग त्यांच्या बदली दुसरे कर्मचारी नेमायचे किंवा कंत्राटी पद्धत राबवायची याचा विचार करू असं म्हणत अनिल परब यांनी सूचक इशारा दिला
या संपामुळे एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि अजून नुकसान होऊ नये आणि जनतेला त्रास होऊ नये यासाठी आम्ही कारवाया मागे घेत आहोत परंतु तरीही कोणाला कामावर येऊ वाटलं नाही तर आम्हाला वेगळे पर्याय निवडावे लागतील असे अनिल परब म्हणाले