मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. त्यामुळं या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठीच्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी पाऊल उचलायला सुरवात केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद महानगपालिकेची मुदत 28 एप्रिल रोजी म्हणजेच आज संपत असून नवी मुंबई महानगपालिकेची मुदत 7 मे रोजी संपणार आहे. तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत 28 जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणं शक्य नाही, त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”