हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. त्याचबरोर भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे सातासमुद्रापारची पर्यटक पर्यटनासाठी येथे येत असतात. मुंबईत पर्यटनासाठी अनेक अश्या जागा आहेत ज्या फार पूर्वीपासून येथे स्थित आहेत. त्यातील सर्वात प्राचीन आणि बौद्ध भिकुंची ओळख करून देणारी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी. एलिफंटा लेणीला (Elephanta Caves) भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. आता याच स्थळाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे असणाऱ्या जेट्टीचा विकास करण्यात येणार आहे.
बोट लावण्यासाठी केला जाणार विकास
एलिफंटा लेणीला भेट देण्यासाठी लाखो देशी व विदेशी पर्यटक हे बोटीने गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते घारापुरी असा जलमार्गाने प्रवास करीत असतात. शेतबंदर जेट्टीला प्रवाश्यांची चढ उतार करण्यासाठी एकूण सहा ठिकाणी बोटी लावता येतात. परंतु असे जरी असले तरी एलिफंटा लेणी येथील जेट्टीची बोट लावण्यासाठीची जागा कमी पडत आहे. त्यामुळे बोट चालवणाऱ्यांना अडचणी निर्माण होताना दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर या कमी जागेमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे अपघात होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकार या ठिकाणचा विकास करणार आहे. असे सांगण्यात येत आहे.
विस्तारिकरणासाठी तब्बल 87 कोटी 84 लाख रुपयांची तरतूद
या समस्येवरती मात करण्यासाठी या जागेचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने तब्बल 87 कोटी 84 लाख रुपयाची तरतूद केली आहे. जेट्टीच्या विस्तार कामाचा प्रस्ताव हा महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी सादर केला आहे. यामध्ये जेट्टीची लांबी आणि रुंदी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विस्तार हा मोठ्या प्रमाणत आणी चांगला होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
235 मीटर लंबीचे होणार बांधकाम
राज्य सरकारने तरतूद केलेल्या या रकमेच्या अंतर्गत (निधीच्याअंतर्गत) जेट्टीवर 235 मीटर लंबीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच बर्थिंग जेट्टीसाठी 85 मीटर लांबीचा मार्ग वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तयार झालेला गाळ काढण्याचे कामही पूर्ण केले जाणार आहे. जेट्टीच्या सद्यस्थितीमुळे पर्यटकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्ती उपाययोजना आणि तोडगा काढण्यासाठी आता जेट्टीचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा पर्यटनास चांगला फायदा होणार आहे.