औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी २० जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली. तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारला आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली.
आता केंद्र आणि राज्य सरकारने ताकद लावण्याची गरज असून शपथविधी विधी नंतर जे-जे प्रयत्न राज्य सरकार टिकवण्यासाठी केले तेच प्रयत्न आता आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने करावेत अशी मागणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेक बलिदान मराठा समाजाने दिले. तसेच शांत पद्धतीने अनेक आंदोलने देखील केले. तरीही मराठा समाजच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. यामुळे मराठा समाजातुन नाराजी व्यक होत होती. मात्र सरकारकडून मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल केल्याने कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.