हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी व गणेशोत्सव सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने राज्य सरकारला महत्वाचा इशारा दिला आहे. केरळमधील रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून केरळबरोबरच महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार राज्यात आता रात्रीच्या वेळी संचारबंदी करण्याचा विचार करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान केले आहे.
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याचे प्रमाण पहिल्यापेक्षा आता कमी आहे. मात्र, केरळ राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता. केंद्र सरकारकडून कोरोनात खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच काही दिवसांसाठी संचारबंदीचा अवलंब करण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. त्यानुसार आजा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत तसेच केंद्र सरकारकडून देण्यात आलेलया सूचनाबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल.
राज्यातील नागरिकांनी सध्या कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे व सणासुदींच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळली पाहिजे. केरळ व महाराष्ट्राने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेत अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.