मंत्र्यांचा अजब कारभार!!! कोरोना उपचार खाजगी रुग्णालयात अन् बिल भरली सरकारी तिजोरीतून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. या कालावधीत राज्यातील अनेक मत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच दरम्यान, राज्य सरकार मधील जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत त्याची लाखोंची बिले सरकारच्या तिजोरीतून भरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

‘झी 24 तास’ ने याबाबत वृत्त दिले असून राज्यातील 18 मंत्र्यांवर एकूण 1 कोटी 40 लाख रुपये खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात आला आहे. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, छगन भुजबळ, सुभाष देसाई, अनिल परब, यांचा समावेश आहे.

कोणत्या मंत्र्यांवर किती रुपये खर्च-

आरोग्यमंंत्री राजेश टोपे – 34 लाख 40 हजार

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत – 17 लाख 63 हजार

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ-  14 लाख 56,604

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार – 12 लाख 56,748

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड – 11 लाख 76,278

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – 9 लाख 3,401

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार – 8 लाख 71,890

जलसंपदामंत्री जयंत पाटील – 7 लाख 30,513

उद्योगमंत्री सुभाष देसाई – 6 लाख 97,293

परिवहनमंंत्री अनिल परब – 6 लाख 79,606