राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून ओमायक्रोन चा धोकाही वाढला आहे. त्यातच आता राज्य सरकार मधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे तनपुरे यांना यापूर्वी देखील कोरोनाची लागण झाली होती.

प्राजक्त तनपुरे यांनी ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली. आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत ही विनंती.

कोण आहेत प्राजक्त तनपुरे-

प्राजक्त तनपुरे हे राज्य सरकार मधील राज्यमंत्री आहेत. आदिवासी, उच्च आणि तंत्र शिक्षण, नगरविकास आणि आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन या विभागाच्या राज्यमंत्रीपदाची सूत्रं त्यांच्याकडे आहेत. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.