…त्यामुळे भाजपचे सरकार येऊ शकले नाही; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमागील सत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सॉंगितले. तसेच पंतप्रधान मोदींनीच आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून पहाटेच्या शपथविधीबाबत, कोण कोणाला भेटायला चालले आहे यावर आमचे बारीक लक्ष होते. आमच्यातही पारदर्शकता असल्यामुळे त्याकाळी भाजपचे सरकार येऊ शकले नाही, असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपसोबत आघाडी करावी अशी ऑफर दिली असल्याचे सांगितले. होय पवार जे काही बोलले ते खरच बोलले. त्याकाळी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरु होते. आम्हालाही माहिती होते की अजित पवार हे पहाटेच्या शपथविधीसाठी गेले होते. अजित पवारांमध्येही पारदर्शकता आहे. भाजपच्या अनेक गोष्टींवर आमचे बारीक लक्ष होते. आम्ही लक्ष ठेवल्यामुळे आणि आमच्या पारदर्शकतेमुळे भाजप यशस्वी नाही.

कोरोनाबाबत सांगायचे झाले तर आज मुंबईत एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने नागरिकांना दिले आहेत. मुंबई महापालिकेडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावत नाहीत. त्यामुळे नागरिकही मास्क लावत नाहीत,असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे अनेक लग्न समारंभात गेल्या होत्या, मीही त्यांच्यासोबत अनेक लग्नात गेलो होतो, आम्ही अनेक सार्वजनिक कार्यक्रमात गेलो होतो, त्यातूनच अनेकांना कोरोनाचीलागण झाली आहे. त्यामध्ये आता वाढ होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Leave a Comment