हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी सहकार मंत्री आणि तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासकाका उंडाळकर यांच्या जाण्याने कराड तालुक्याने एक हक्काचा माणूस गमावला आहे. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विलासकाकांना श्रद्धांजली वाहिली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, विलासराव उंडाळकर हे राज्याचे दिग्गज नेते होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील सहकार क्षेत्रातील आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातील सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
उंडाळकर घराण्याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. सर्वच उंडाळकर बंधूनी अतिशय चांगल्या प्रकारे तो वारसा जपला. सातारा जिल्ह्यातील जिल्हा बँक असो किंवा जिल्यातील इतर सहकारी संस्था असतील त्या सर्व संस्था आज ज्या प्रगती पथावर आहेत. त्या इथपर्यंत आणण्याचे काम विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालीच झालं. सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा अस नेतृत्व होणार नाही अशा शब्दात त्यांनी विलासकाकांना श्रद्धांजली वाहिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’