बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंचांचे पद रद्द करा; रुपालीताई चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अजूनही काही ठिकाणी बाल विवाहाच्या घटना घडत आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या विवाहाचे प्रमाण वाढले. याबाबात यॊग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्य महिला आयोगावाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास स्थानिक अधिकारी, सरपंच यांचे पद रद्द करावे. तसेच याबाबतचा नवीन नियम लागू करावा,” अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाढते बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पाठविण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रथमच अशा स्वरूपात निर्णय घेतला असून, आपल्या सर्वांच्याच सहकार्याने हा निर्णय यशस्वी होईल याची खाञी वाटते.

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच, विवाह नोंदणी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची जबाबदारी निश्चित करावी. त्यानंतर अशा प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावेत.

करण्यात येणारी नवीन प्रकारची हि दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे.

Leave a Comment