हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत हातावर पोटावर असलेले अनेक कामगार, मजुर आपल्या घराकडे जाण्यासाठी वेळ पडली तर पायी किंवा अवैधरित्या चोरून वाहनांनी प्रवास करत आहेत. असे सर्व स्थलांतरित कामगार, मजुरांनो आहात तिथंच राहा. तुमच्या राहण्याची व जेवणाची सोय सरकार करतंय असं आश्वासक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज पुन्हा मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी राज्यातल्या कामगारांनी महाराष्ट्र सोडू नये. त्यांची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेणार. राहण्याची सोय आणि जेवणाची सोय आम्ही करतो आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. आपण सध्या एका संकटात आहोत त्यामुळं आणखी परिस्थिती बिघडू नये म्हणून तुम्ही आहात तिथेच राहा. इतर राज्यातील कामगार असतील तर त्यांच्या राज्य सरकारशी बोलून त्यांची सोय करण्याचे पूर्ण प्रयन्त महाराष्ट्र सरकार करत आहे. तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधा तुमची व्यवस्था केली जाईल फक्त गर्दी करू नका, अडचण वाढेल असं काही करू नका. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ऊसतोड कामगारांची काळजी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांना केलं आहे. हा अडचणीचा काळ आहे. राज्य सरकार प्रयन्त करतच आहे. मात्र, या संकटाच्या काळात ऊस ऊसतोड कामगार, साखर कारखान्यातील कामगार यांची काळजी घ्या असं मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांना म्हटलं.
डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मानाचा मुजरा
यासोबतच कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टरांना उद्धव ठाकरेंनी हात जोडून मानाचा मुजरा केला. तसंच ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. या उर्जेला काय म्हणायचं? आरोग्य विषयक समस्येशी लढणाऱ्या या सगळ्या वीरांना माझा मानाचा मुजरा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
पोलिसांचे विशेष आभार..
मी पोलिसांचेही आभार मानतो आहे. कारण पोलिसांचे काम हे देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. आपण सक्तीने घरी बसावं यासाठी ते बाहेर काम करत आहेत. त्यांचेही मी धन्यवाद देतो. घराबाहेरची लढाई तुमचंच सरकार लढतं आहे. तुम्ही फक्त घरात राहून आम्हाला साथ द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या पायरीवरच करोना थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर आपण हे युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही असाही आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. अजूनही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अजूनही गर्दी केली जाते आहे, स्वयंंशिस्त पाळली जात नाहीये. ते लवकर आवरा नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालू नका. त्यांना कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
महाराष्ट्रात आढळले ७ नवे करोनाबाधित;संख्या १९३वर
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
भयावह! इटलीत २४ तासांत कोरोनाने घेतला ९००हून अधिक जणांचा बळी
बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला
भारतात ‘या’ ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन