हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-PAN Card : सध्याच्या Pan Card हे अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. जवळपास प्रत्येक आर्थिक कामासाठी त्याचे महत्त्व खूप वाढले आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापासून ते बँक खाते उघडणे, नवीन व्यवसाय सुरू करणे आणि मालमत्तेची खरेदी-विक्री करणे यासाठी आता ते आवश्यक झाले आहे. अशातच जर आपले पॅनकार्ड हरवले तर फार मोठी अडचण निर्माण होते. मात्र, आता यासाठी चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून पॅनकार्डधारकांना इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आता घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत e-PAN Card डाउनलोड करता येईल. हे लक्षात घ्या सगळ्याच वित्तीय संस्था देखील हे ई-पॅन कार्ड स्वीकारतात. पॅन कार्ड हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. ई-पॅन हे व्हर्च्युअल पॅन कार्ड आहे जे आवश्यकतेनुसार कोठेही ई-व्हेरिफिकेशनसाठी वापरले जाऊ शकते.
Pan Card सांभाळून ठेवा
सध्याच्या काळात पॅन कार्डशी संबंधित फसवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. आता फसवणूक करणाऱ्या लोकांनी इतर लोकांच्या पॅनकार्डद्वारे कर्ज घेतल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नागरिकांना नेहमीच पॅन कार्ड सुरक्षित ठेवण्याचे आणि त्याच्याशी संबंधित माहिती अज्ञात लोकांसोबत शेअर न करण्याचे सांगितले जात असते.
प्रकारे डाउनलोड करा e-PAN Card
इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर लॉग इन करा.
इथे e-PAN Cardकार्डच्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर पॅन क्रमांक टाका.
यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल.
नंतर जन्मतारीख टाका.
यानंतर अटी आणि नियमांवर क्लिक करा.
दिलेल्या जागेत आपला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका.
त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर मिळालेला OTP भरा.
त्यानंतर Confirmation या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी शुल्क भरा.
ते UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
यानंतर ई-पॅन डाउनलोड करू शकाल.
ई-पॅन कार्डची PDF डाउनलोड करण्यासाठी, पासवर्ड म्हणून जन्मतारीख एंटर करा. ई-पॅन डाउनलोड केला जाईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pan.utiitsl.com/
हे पण वाचा :
108MP कॅमेरा असलेला OPPO A1 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा
SBI कडून कर्ज घेणे महागले, बँकेने व्याजदरात केली 0.15 टक्क्यांनी वाढ
PM Kisan FPO Yojana : खते, बियाणे अन् कृषी उपकरणांसाठी शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 172 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा