हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरलेले नाही. यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातही अस्थिरता आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. मात्र बाजारातील या मंदीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला रिटर्न देत आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
हे लक्षात घ्या कि,सप्टेंबर 2021 च्या तिमाहीपासून म्युच्युअल फंड्स 68 कंपन्यांमधील आपली गुंतवणूक वाढवत आहेत. यापैकी बहुतांश कंपन्यांचा रिटर्न या काळात निगेटिव्ह राहिला आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी असे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 50 टक्के रिटर्न दिला आहे. यातील तीन कंपन्यांचे शेअर्स येत्या एका वर्षातही आणखी चांगले रिटर्न देऊ शकतील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Stock Market
Asahi India Glass : या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 62% रिटर्न दिला आहे. या शेअर्समध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 0.69 टक्के होती, जी जून 2022 च्या तिमाहीत 1.43 टक्के झाली आहे. Bloomberg च्या consensus rating नुसार, या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. Stock Market
Hindustan Aeronautics : गेल्या एका वर्षात या शेअर्समध्ये 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअर्समधील म्युच्युअल फंडाचा हिस्सा सप्टेंबर 2021 मध्ये 4.71 टक्के होता, जो जून 2022 च्या तिमाहीत 7.83 टक्के झाला. Bloomberg च्या consensus rating नुसार, या शेअर्समध्ये 23 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्याची टार्गेट प्राईस 2175 रुपये दिली आहे. Stock Market
Adani Enterprises : अदानी ग्रुपच्या या शेअर्सने गेल्या एका वर्षात 61 टक्के रिटर्न दिला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये यामध्ये म्युच्युअल फंडांची गुंतवणूक 0.82 टक्के होती. जून 2022 च्या तिमाहीत ती 2 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. Bloomberg च्या consensus rating नुसार, या स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची घसरण होऊ शकते. Stock Market
Chalet Hotels Ltd : या शेअर्स मध्ये एका वर्षात 76 टक्के वाढ झाली आहे. 7 जुलै रोजी सकाळी त्याची किंमत 335 रुपये होती. या शेअर्समधील म्युच्युअल फंडांचा हिस्सा सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 16.53 टक्के होता, जो जून 2022 च्या तिमाहीत वाढून 19.69 टक्के झाला. Stock Market
Jamna Auto Industries : हा शेअर्स गेल्या एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअर्समधील म्युच्युअल फंडाचा हिस्सा सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 9.82 टक्के होता, जो जून 2022 च्या तिमाहीत वाढून 13.39 टक्के झाला. Bloomberg च्या consensus rating नुसार, हे शेअर्स आणखी 2 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम
PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल
Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या
TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत
Share Market मध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे समजून घ्या