हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी बंद होण्याआधीच्या सलग 8 ट्रेडिंग सत्रांमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी पातळीला स्पर्श करत आश्चर्यकारक वाढ दर्शविली. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या आणि वस्तूंच्या घसरलेल्या किंमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे बाजारामध्ये ही तेजी पाहायला मिळते आहे. आशियाई आणि इतर परदेशी बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार खूप वेगाने पुढे सरकतो आहे. भविष्यातही हाच कल कायम राहण्याची अपेक्षा अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना बाजारातून कमाई करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. याच दरम्यान एचडीएफसी सिक्युरिटीजने येत्या 2-3 आठवड्यात खाली दिलेल्या 5 शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Devyani International : 184-188 रूपयांपर्यंत खरेदी करा. जर घसरण असेल तर 164-168 रुपयांनी शेअर वाढवा. कारण पुढील 2-3 तिमाहीत हा स्टॉक 220 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. Stock Tips

Mishra Dhatu Nigam : 235-239 रूपयांपर्यंत खरेदी करा. हा स्टॉक 211-215 पर्यंत आणखी वाढू शकतो. तसेच पुढील तिमाहीत याची किंमत 281 रुपयांपर्यंत जाऊ शकते. Stock Tips
![]()
Marksans Pharmaceuticals : 56-57 रूपयांपर्यंत खरेदी करा. यानंतर जर घसरण असेल तर 50 रुपयांवर आणखी पैसे गुंतवा. येत्या 2 तिमाहीत हे शेअर्स 66 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. Stock Tips

Lumax Auto Technologies : यासाठी 262-267 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच यानंतर, घसरण झाल्यास 230-235 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. कारण येत्या 2-3 तिमाहीत तो 312 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. Stock Tips

PDS : यासाठी 345-362 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच घसरण झाल्यास 307-313 पर्यंत खरेदी केला जाऊ शकतो. त्याच बरोबर बाजारात तेजी कायम राहिल्यास पुढील 2-3 तिमाहीत तो 417 रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://dil-rjcorp.com/
हे पण वाचा :
Business Idea : हिवाळ्यात अशा प्रकारे ड्रायफ्रूट्सचा व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
DCB Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 8.25% पर्यंत व्याज
Stock Market : बुल अन् बेअर मार्केट म्हणजे काय ??? यादरम्यान गुंतवणूकदारांनी काय करावे ते जाणून घ्या
Gold Loan : गोल्ड ओव्हरड्राफ्ट लोन सुविधा म्हणजे काय ??? त्याचे फायदे अन् जोखीम समजून घ्या
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ, जाणून घ्या संपूर्ण आठवड्यातील सराफा बाजाराची स्थिती




