हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : जागतिक बाजारातील आर्थिक मंदीच्या दरम्यान भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ उतार होत आहेत. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. आज आपण गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न देणाऱ्या 5 शेअर्स बाबत माहिती जाणून घेउयात…
Bank of Maharashtra : या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 24.70 रुपये आहे. मात्र आज या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आज इंट्राडे मध्ये ते 23 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता. गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Stock Tips
Concor : या कंपनीचे शेअर्स अलीकडेच 828.25 रुपयांच्या सार्वकालिन उच्चांकावर पोहोचले. गुरुवारी हे शेअर्स0.72 टक्क्यांनी घसरून 799.85 रुपयांवर ट्रेड करत होते. या शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत 30 टक्के रिटर्न दिला आहे. Stock Tips
Union Bank of India : युनियन बँकेच्या शेअर्सनी गुरुवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. इंट्राडेमध्ये बँकेच्या शेअर्सनी 3.35 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आणि 67.30 रुपयांची पातळी गाठली. या शेअर्सने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 83 टक्के रिटर्न दिला आहे. Stock Tips
Coal India : कोल इंडियाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 263.40 रुपये आहे. गुरुवारी, इंट्राडेमध्ये हे शेअर्स 0.47 टक्क्यांनी घसरून 254.60 रुपयांवर ट्रेड करत होते. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे 50 टक्के रिटर्न दिला आहे.
PI Industries : कीटकनाशके आणि एग्रोकेमिकल्सची देशातील आघाडीची उत्पादक असलेल्या PI Industries चे शेअर्स बुधवारी 11 टक्क्यांनी वाढले. काल त्याने 3,698.45 रुपयांचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. आज हे शेअर्स घसरणीने ट्रेड करत आहेत. गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स 42 टक्क्यांनी वाढले आहेत. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/bank-of-maharashtra/mahabank/532525/
हे पण वाचा :
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
Realme 5G speed edition स्वस्तात खरेदी करण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आज 139 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याची चमक वाढली तर चांदी पडली फिकी, आजचे नवीन दर पहा
PIB Factcheck : पॅन नंबर अपडेट न केल्यास SBI YONO खाते बंद होणार, ‘या’ मेसेजमागील सत्यता तपासा