मधुचंद्राच्या रात्री नवरीच्या पोटात अचानक दुखू लागले, नवरदेव औषध घेऊन येताच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिंड : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. भिंड जिल्ह्यातील बैरागपूरमध्ये एका घरात नवीन लग्न झाले होते. नवीन लग्न झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. कोरोनाच्या महामारीत लग्नाचा समारंभ आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित पार पडल्याने घरातील सर्वजण खुश होते. पण त्यानंतर मधुचंद्राच्या रात्री जो धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे नवरदेवासह संपूर्ण घर हादरले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
मनोज सोनी या व्यक्तीने दलालांच्या माध्यमातून 35 हजार रुपये देऊन लग्न केले होते. या लग्नाला काही जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांचाही लग्नसोहळा व्यवस्थितपणे पार पडला. लग्नानंतर मनोज खूप आनंदी होता. लग्नानंतर मनोज आपल्या बायकोला घेऊन घरी आला. त्यानंतर मधुचंद्राच्या रात्री 11 वाजता नवरीच्या पोटात अचानक दुखू लागले. यानंतर उन्हाळ्यामुळे त्रास होत असेल. शतपावली केल्यानंतर बरं वाटेल असे नवरदेवाने सांगितले. यानंतर नवरी तासभर घराबाहेर फेऱ्या मारत राहिली. पण तरीदेखील पोटात दुखायचे थांबले नाही. यानंतर नवरा औषध आणण्यासाठी घराबाहेर गेला.

काही वेळानंतर नवरदेव जेव्हा औषध घेऊन आला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण नवरी खोलीतून गायब झाली होती. त्याने तिला सगळीकडे शोधले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पण तरीदेखील नवरीबद्दल काहीच समजू शकले नाही. यानंतर तरुणाने ज्या दलालाकडून नवरीला खरेदी केले होते. त्यानेदेखील कोणताही संपर्क केला नाही. मात्र नवरी घरी परतेल, असा त्याला विश्वास मनोजला आहे. मध्य प्रदेशात लग्नाच्या नावावर धोका देण्याचे अनेक प्रकार घडत असतात.

Leave a Comment