सूरतमध्ये रोड शोवेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान, आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत असताना त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली.

सुरतमध्ये रोड शोवेळी अचानक गोंधळ उडून गेला. यावेळी जमलेल्या जमावातील लोकांमध्ये एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. यावेळी रोड शोचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात आले. माध्यमांच्या कॅमेऱ्यावर देखील दगडफेक करण्यात आली.

अचानकपणे दगडफेक सुरु झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या गाडीत जाऊन बसले. काही वेळाने सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला रोड शो सुरु केला. या अचानकपणे घडलेल्या घटनेनंतर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.