रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज : राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुढील महिन्यात एक लाख रेमडेसीव्हिरची गरज भासणार आहे. हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनीटोपेंनी मागणी केली.

राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आकडेवारीसह मांडली. सध्या राज्याला 50 हजार रेमडेसीव्हिर इंजेक्शनाची गरज आहे. पुढील महिन्यात हा आकडा एक लाखाहून अधिक जाणार आहे. राज्यात रेमडेसीव्हिरची कमतरता आहे. त्यामुळे रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी टोपे यांनी केली.

राज्यात रेमडेसीव्हिरचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे लसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक खासगी रुग्णालयांना रेमडेसीव्हिरची माहिती विचारली जाणार आहे. कुणाला लस दिली जातेय याचीही तापसणी करण्यात येणार आहे. रेमडेसीव्हिर देण्यात येणाऱ्या रुग्णांची वर्गवारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसीव्हिरचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून जिलाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवावं, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यात दिवसाला 6 लाख कोरोना व्हॅक्सीन हव्या आहेत.

आठवड्याला 40 लाख लस हव्या आहेत. राज्यातील कोरोना लसीकरण वेगाने होत असल्याने महिन्याला एक कोटी लस लागणार आहेत, असं सांगतानाच या विषयात कुणालाही राजकारण करायचं नाहीये. 25 वर्षापासून आपण एकमेकांना ओळखतो. मी काय फार मोठा माणूस नाही. संक्रमण वेगाने पसरतंय. विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मदत करावी. व्हॅक्सिन मिळावं, आयसीयू, आणि व्हेंटिलेटर मुंबई आणि पुणे येथे वाढवण्याची गरज आहे. ऑक्सिजनची कमतरता केंद्र सरकारला सांगून दूर करावी, असं टोपे म्हणाले.

Leave a Comment