औरंगाबाद : शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवार, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन करून फिरताना दिसतात. रात्री ८ वाजता दुकाने बंद केल्यावर घरी जाण्यासाठी ते गर्दी करतात. यामुळे आठ वाजता रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते. ही बाब समोर आल्यावर रात्री साडेसात अथवा त्यापूर्वी दुकाने बंद करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यास सांगितले जात आहे.
शहरातील काही कॉलन्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो तर काही व्यापारी रात्री ८ वाजल्याशिवाय शटर खाली करीत नाहीत. परिणामी पोलिसांना दंडुका दाखवून दुकाने बंद करावे लागत आहे. शहरातील गुलमंडी, शहागंज, टिळकपथ, रंगारगल्ली, कुंभारवाडा आदी भागांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील ३३ टक्के अधिकारी-कर्मचारी यांना रोज रात्री ७ ते ११ पर्यंत बंदोबस्ताचे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group