औरंगाबाद हादरले! दिवसाढवळ्या कॉलेज जवळून ओढत नेत विद्यार्थिनीची हत्या (CCTV)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hello Maharashtra (@hellomaharashtra.in)

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. यामध्ये आरोपीने तरुणीला कॉलेजपासून चक्क २०० फूट ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात पोलिसांचा धाक उरला नाही, असंच म्हणावं लागेल.

मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घडली घटना असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.