कोल्हापूर प्रतिनिधी । परदेशातून येणारे नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थींनी यांनी स्वत:हून 14 दिवस घरामध्ये कोरोनटाईन व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोरोनाबाबत तातडीची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना व नियोजन याबाबत आढावा घेतला. पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी अलगीकरण तसेच विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत नियोजन करावे. तेथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर तेथे देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतही नियोजन करावे. जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडूनही त्यांनी माहिती घेतली.
जिल्ह्यामध्ये इंधन, गॅस तसेच पुरसा अन्न धान्याचा साठा करुन ठेवावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विलगीकरण कक्षाला भेट देवून पाहणी करुन सूचना दिली. कोरोनाबाबत प्रशासनामार्फत योग्य प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी माहिती दिली.
* एकूण आलेले परदेश नागरिक – 114
* इतर ठिकाणाहून आलेले नागरिक – 04
* विलगीकरण कक्षामध्ये दाखल – 03
* तपासणी करिता पाठविण्यात आलेले नमुने – 06
* निगेटीव्ह – 03
* रिजेक्टेड – 02
* तपासणी पाठविलेले अप्राप्त अहवाल – 01
* घरी विलगीकरण करण्यात आलेले प्रवासी – 115
* त्यापैकी पाठपुरावा करुन 14 दिवस पूर्ण प्रवासी – 24
* देखरेखीखालील असणारे प्रवासी – 91
* विलगीकरणासाठी शासकीय रुग्णालयातील बेड – 38
* विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील बेड – 61
* प्रसिध्दी करिता हस्तपत्रिका वाटप – 1,75,000
* स्टिकर्स पोस्टर्स – 8600
* होर्डिग – 50
स्क्रीनिंगसाठी संपर्क
* डॉ. अजय केणी, ॲस्टर आधार हॉस्पिटल 9225068504
* डॉ. वैशाली गायकवाड, डी.वाय.पाटील हॉस्पिटल 9822379069
* डॉ. सतीश पुराणिक, अथायु हॉस्पिटल 9820057818
* डॉ. प्रकाश दीक्षित, डायमंड हॉस्पिटल 9850448680
* डॉ. अशोक खटावकर, ॲपल हॉस्पिटल 9420778535