सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला?? अखेर एकनाथ शिंदेनी सांगूनच टाकलं

Submarine project at Sindhudurg
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आशिया खंडातील पहिला पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात प्रस्तावित आहे. परंतु सिंधुदुर्ग येथील हा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project At Sindhudurg) गुजरातला गेल्याच्या बातम्या गेल्या २ -३ दिवसांपासून जोरदार पसरत नाहीत. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. परंतु हा पाणबुडी प्रकल्प खरोखरच गुजरातला गेला आहे का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ”खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा या प्रकल्पाबाबत सांगताना म्हंटल होते कि सिंधुदुर्ग येथील पाणबुडीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील.

संजय राऊतांच्या सरकारवर निशाणा –

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाणबुडी प्रकल्पावरून सरकारवर हल्लाबोल केला होता. आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट्स गुजरातमधे गेले आहेत. . मुंबईतील उद्योजकांमधे दहशत पसरवून त्यांना गुजरातला घेऊन जाण्याचे काम सुरु आहे, पण त्यापेक्षा त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा असा खोचक टोला राऊतांनी लगावला. तसेच त्यांनी यावरून नारायण राणेंना लक्ष्य केलं. राणे सतत म्हणतात ना कि मी २५ वर्ष शिवसेनेत होतो, तर मग आता त्यांनी महाराष्ट्रातील एकही उद्योग राज्याच्या बाहेर जाऊ देणार नाही यासाठी हिम्मत दाखवावी असं आव्हान राऊतांनी राणेंना दिले.