औरंगाबाद – प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगासमोर सादर झाला असून, यानुसार आता शहरातील वॉर्डांची संख्या 126 आणि प्रभागांची संख्या 42 होईल हे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या प्रारूप आराखड्यातून स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेला नवीन बोर्ड रचना आणि प्रभागाचा आराखडा सादर करण्याचे आदेश मागील महिन्यात दिले होते एक महिन्यापासून महापालिका आराखडा सादर करण्यास आयोगाकडून वारंवार मुदत वाढवून घेत होती. काल अखेर बुधवारी आयोगाला ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने आराखडा सादर करण्यात आला किरकोळ दुरुस्ती नंतर तो आयोगाकडून मंजूर केला जाईल.
निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मनपाला नवीन प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 18 नोव्हेंबर ही मुदत दिली होती. परंतु महापालिकेचे प्रशासक शहरात नसल्यामुळे दहा दिवसांची मुदत वाढवून घेतली होती. ती 26 नोव्हेंबरला संपली त्यानंतर पुन्हा चार दिवसांची मुदत वाढवून मागितली 30 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आराखडा सादर होईल असे सांगण्यात आले. परंतु तरीही मुदतीत आराखडा तयार झाला नाही शेवटी 5 डिसेंबर चा मुहूर्त काढण्यात आला. त्यालाही विलंब लावत अखेर 8 डिसेंबरला कच्चा आराखडा सादर करण्यात आला महापालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी मुंबईत गेले असून त्यांच्या समक्ष आराखड्यात दुरुस्ती करण्यात येईल.
कसा असेल आराखडा –
शहरात नव्याने 126 वॉर्ड तयार होतील तर एकूण 42 प्रभाग असतील. एका प्रभागात तीन वॉर्डांचा चा समावेश असेल. प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे पूर्वी जेवढे बोर्ड ओबीसी महिला आणि पुरुषांसाठी राखी होते ते आता खुल्या प्रवर्गात राहतील असे बोलले जात आहे.