गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती; भाजप खासदारांचा घरचा आहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेते सुब्रमण्यन स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोरोना विरोधातील लढाईची सूत्रे नितीन गडकरी यांच्या कडे द्यावी हा माझा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला असता तर ही वेळ आलीच नसती, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

देशात करोना स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढाईची सूत्रे नितीन गडकरींच्या हातात द्यायला हवी, असा प्रस्ताव मी दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारला असता तर आज कोरोनाची स्थिती सरकारच्या चौकटीत राहिली असती. पण आता देशातील कोरोनाच्या स्थितीवर सुप्रीम कोर्टाने समिती नेमली आहे. सॉलिसिटर जनरल कोर्टाला शरण गेले आहेत.

आधी गृहमंत्रालय आदेश देत होतं. आता सरकारला सुप्रीम कोर्टाचं ऐकावं लागणार आहे. लोकशाही देशात हा एक प्रकारे सरकारचा पराभव आहे,’ अशी गंभीर टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्यामुळे आता राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

सुब्रण्यन स्वामींनी ५ मे रोजी एक ट्वीट केलं होतं. ‘भारतानं इस्लामिक आणि ब्रिटिश घुसखोरांचाही सामना केलाय, तसंच देश करोनाशी दोन हात करेल. योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर आपल्याला करोनाच्या आणखीन एका लाटेचा सामना करावा लागू शकतो, यामध्ये लहान मुलांना अधिक धोका उद्भवू शकतो. अशावेळी पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणं व्यर्थ आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाची जबाबदारी नितीन गडकरींना सोपवावीत’, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.