Chandrayaan 3 चे लँडिंग अखेर यशस्वी!! भारताला मोठं यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजचा दिवस संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.  अखेर आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतवासी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज चांद्रयान-3 मोहित यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केल्यामुळे भारताने आज नवा इतिहास रचला आहे. गेल्या 14 जुलै श्रीहरीकोटा येथून रोजी चांद्रयान-3 लॉन्च करण्यात आले होते.

चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिल देश बनला आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी भारतवासीयांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. आज दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना देखील नरेंद्र मोदी व्हरच्युअली या ऐतिहासिक क्षणासाठी उपस्थित राहिले. तर सर्व भारतीयांनी ऑनलाइन पद्धतीने चांद्रयान-3 चे लँडिंग पाहता आले. आजचा क्षण सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे.

दरम्यान, यापूर्वी इस्त्रोकडून चंद्रयान 2 मोहीम राबवण्यात आली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कंबर कसून चंद्रयान 3 मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आहे. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी देशातील वेगवेगळया भागातून पूजा, अर्चा, होम हवन, महाअभिषेक करण्यात आला होता. नागरिक मंदिरात जाऊन चंद्रयान 3 साठी प्रार्थना करत होते. आज अखेर ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.