सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडतात : धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | डोंगरी भागात इमारत कोसळून ४० लोक या मलब्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची पाहण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी धनंजय मुंडे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

डोंगरी येथील अपघातात पडलेली इमारत हि एका विकासकाला विकसित करण्यासाठी दिली होती. त्याच्या हलगर्जीपणामुळे हि इमारत पडली आहे असा आरोप स्थानिक लोक करत आहेत. त्याच आशयाचा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारला असता धनंजय मुंडे यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक देखील बैठक पाच वर्षात घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात उत्तर द्यावी. सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळेच अशा घटना घडत आहेत असा सणसणीत आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळल्याने त्या इमारतीखाली जवळपास चाळीस लोक दबली गेली आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर केले जात आहे. तसेच चिंचोळी गल्ली असल्याने सध्या या ठिकाणी बचाव कार्याला अडथळा निर्माण होत आहे. तर साडे अकरा वाजता हि घटना घडली असताना दोन तास या ठिकाणी प्रशासनाचा कोणीही व्यक्ती दाखल झाला नाही. त्यामुळे सरकार अशा घटनांवर किती गंभीर आहे हे लक्षात येते असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.