हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आयकर विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशात पुण्याच्या साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. राज्यातील 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकऱ्यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.
साखर आयुक्तांनी परवाना न दिलेल्या कारखान्यांमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडिक, समाधान आवताडे, संजय काका पाटील, बबनराव पाचपुते या भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखला आहे.अगोदर शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम द्यावी मगच परवाना देण्यात येईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हे आहेत प्रमुख भाजप नेते व कारखाने
1) पंकजा मुंडे – वैद्यनाथ कारखाना
2) रावसाहेब दानवे –रामेश्वर कारखाना
3) हर्षवर्धन पाटील – इंद्रेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना
4) राधाकृष्ण विखे पाटील – राहुरी कारखाना
5) धनंजय महाडिक – भीमा-टाकळी कारखाना
6) समाधान आवताडे – संत दामाजी कारखाना
7) संजय काका पाटील – यशवंत कारखाना आणि एस जी झेड, तासगाव
8) बबनराव पाचपुते – साईकृपा कारखाना
हे आहेत शिवसेना नेते
1) तानाजीराव सावंत – भैरवनाथ शुगर
2) कल्याणराव काळे – चंद्रभागा कारखाना
3) दिग्वीजय बागल – मकाई कारखाना
4) दिलीप माने (माजी काँग्रेस आमदार) – सिद्धनाथ कारखाना