उद्याचं निर्णय जाहीर करा बस्स!! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत मजूर आणि त्याच्या कुटंबाची व्यथा मांडली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ”इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलंय. आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करून त्यांच्या ताटात माती? ते हॉटस्पॉट मध्ये नाहीत न हॉटस्पॉटला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!”.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न लावून धरत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला असून पावसामुळे उघड्यावर राहत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय उद्याच घेण्याची मागणी राज्य सरकारला केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

 

Leave a Comment