प्रेमी युगुलाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; घरच्यांकडून लग्नास विरोध झाल्याने उचलले पाऊल

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी गावात एका प्रेमी युगुलाने शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडाकीस आली आहे. आज शुक्रावरी (9एप्रिल) सकाळी शेतात एका तरुण आणि तरुणीचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय डुकरे वय (16), आणि सरस्‍वती कराले वय (18) यांच्यात प्रेमसंबंध होते. नुकतेच सरस्वती चे लग्न ठरले होते. याच कारणातून या प्रेमीयुगुलाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.

शेतीच्या कामानिमित्त सरस्वतीचे वडील या गावात आपल्या परिवारासाह आले होते. याच दरम्यान सरस्वती आणि अजय यांच्यात प्रेम झाले. मात्र दोघांच्या वयात आंतर असल्याने दोघांचे लग्न झाले नाही. त्यातूनच सरस्वतीचे दुसरीकडे लग्न ठरवण्यात आले. लग्नासाठी त्यांचे कुटुंब गावी जाणार होते मात्र त्याच रात्री अजय आणि सरस्वती यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान या घटनेमूळे एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत बालापुर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. अजय आणि सरस्वती या दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करिता देण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

You might also like