हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना आज घडली असून मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अधिक या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन केले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. मात्र आर्थिक अडचणी मुळे आणि कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या कुटूंबात डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.