सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार ?

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | अहमदनगर येथील जागेचा तिढा आघाडीमध्ये कायम आहे.राष्ट्रवादी नगर येथील जागा सोडायला तयार नसल्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार का या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटल म्हणाले की,आघाडी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. त्यामुळे आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील यांना नगर येथून लोकसभा निवडणुक लढवायची आहे. मात्र नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. ही जागा आपल्याच मिळावी, असा आग्रह सुजय विखे-पाटील यांनी केला आहे.

नगरची जागा कोणत्याही परिस्थितीत लढणार म्हणजे लढणार, असा पवित्रा सुजय यांनी घेतला आहे. ते मध्यंतरी भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा चालली होती. आता ते राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा चालू आहे.त्यामुळे सुजय विखे-पाटील आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हा महत्वपूर्ण प्रश्न आहे.
इतर महत्वाचे –

मसाला गोदामाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे विराजमान

सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी.