विजेचा तार कोसळून बाप लेकाचा मृत्यू

0
77
power line
power line
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उदगीर | विजेची तार तुटून अंगावर पडल्यामुळे बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उदगीर तालुक्यातील बामणी शिवारात शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवरून शेतातून घरी परत निघालेल्या बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला.

दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास बामणी येथील शेतकरी नारायण यादवराव कोडमंगले (50) आणि त्यांचा मुलगा सिद्धरामेश्वर नारायण कोडमंगले (16) हे दोघे दुचाकी वरुन शेतात घराकडे जात असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी विजेच्या खांबावरील तारा तुटून त्यांच्या दुचाकी व अंगावर पडल्याने विजेचा शॉक लागून बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

यांनी दुर्दैवी घटनेबद्दल बामणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अनिल गंगाधर कोडमंगले यांनी देवणी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस जमादार उस्तुर्गे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here