नवी दिल्ली । अल्फाबेट इंकचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला हे जगातील 100 सीईओ च्या लिस्टमध्ये सामील आहेत ज्यांना जास्त पैसे मिळतात. असा दावा एका नव्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एस अँड पी 500 निर्देशांकात लिस्टेड कंपन्यांचे सीईओ सर्वाधिक पेआउट घेतात हे लपलेले नाही. तथापि, या रिपोर्टमध्ये कोणत्या सीईओला अधिक पगार मिळतो हे अनेक मेट्रिक्सच्या आधारे ठरविले जाते. हा रिपोर्ट तयार करण्यासाठी केलेल्या अभ्यासात तीन गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या. पहिले कंपनीच्या मागील कामगिरीच्या आधारे सीईओ किती पगार घेत आहे.
याशिवाय, सीईओचे सॅलरी वाढविण्याच्या विरोधात किती शेयरहोल्डर्सनी मतदान केले आहे आणि कंपनीच्या सरासरी कर्मचार्यांच्या तुलनेत सीईओना किती सॅलरी मिळते याकडेही लक्ष दिले आहे.
सुंदर पिचाई यांना 1085 कर्मचार्यांच्या बरोबरीने पगार मिळतो
विशेष म्हणजे या लिस्ट मधील सर्वाधिक पगार असलेले सीईओ म्हणजे अल्फाबेटचे सुंदर पिचाई, त्यांना 280,621,552 अमेरिकन डॉलर इतका पगार मिळतो. त्या तुलनेत, अल्फाबेट मधील इतर कर्मचार्यांचे सरासरी वेतन 258,708 डॉलर आहे. अल्फाबेटमधील सीईओच्या पगाराइतकाच सुमारे 1085 कर्मचार्यांना पगार मिळत असल्याचे यातून स्पष्ट होते. यारिपोर्टनुसार, पिचाई यांना एका कर्मचार्याच्या सरासरी पगारापेक्षा 266,698,263 डॉलर्स जास्त मिळतात.
सत्या नडेला यांचा पगार किती आहे?
मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला या लिस्ट मध्ये 24 व्या स्थानावर आहे. त्यांना 42,910,215 डॉलर इतका पगार मिळतो. सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्टच्या कर्मचार्यांच्या सरासरी पगारापेक्षा 27,896,691 डॉलरने जास्त मिळते. या कंपनीतील प्रति कर्मचारी सरासरी वेतन 1,72,412 डॉलर आहे. म्हणजेच 249 कर्मचार्यांना सत्या नडेला यांच्या पगाराइतके पैसे दिले जातात.
मार्क झुकेरबर्ग यांच्या नावाचाही यात समावेश होता
सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनेक सोशल मीडिया कंपन्या आहेत. परंतु या रिपोर्टमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गचा समावेश 73 वा आहे. झुकेरबर्गला 23,314,973 डॉलर्स इतका पगार आहे. त्यांना सरासरी कर्मचार्यांपेक्षा 9,415,973 डॉलर्स अधिक मिळतात. फेसबुकवर कर्मचार्यांचे सरासरी पगार 2,47,977 डॉलर आहे. म्हणजेच मार्क झुकरबर्गला फेसबुकच्या 94 कर्मचार्यांच्या स्लरी इतका सरासरी पगार मिळतो. मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेटच्या तुलनेत हे अत्यंत कमी आहे.
या लिस्टमध्ये फक्त टेक कंपन्याचेच लीडर्स नाहीत. त्यामध्ये वॉल्ट डिस्ने कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब एगर, फॉक्स कॉर्पोरेशनचे लॅलेन मुर्दाक आणि क्रॉफ्ट हेन्झ कंपनीचे मिगुल पॅट्रेसिओ हेदेखील टॉप 30 मध्ये आहेत.
2015 पासून या 9 कंपन्यांचे सीईओ सतत सामील होत आहेत
विशेष म्हणजे ज्या कंपन्यांनी या लिस्टमध्ये सातत्याने स्थान मिळविले आहे, त्यांची कामगिरी लिस्टमध्ये समाविष्ट नसलेल्या कंपन्यांपेक्षा वाईट आहे. हा रिपोर्ट 2015 पासून दरवर्षी सतत प्रकाशित केला जातो. या यादीमध्ये प्रत्येक वेळी 9 सीईओ यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यात डिस्कवरी, वॉल्ट डिस्ने, कॉमकास्ट, एटी अँड टी,गोल्डमाय शेक्स, आयबीएफ, मॅचेसन, राल्फ लॉरेन आणि रेगेनरॉन यांची नावे आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.