हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या मंथन मेळाव्यात अजित पवार यांनी बारामतीची जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे आता अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असेल? याबाबत चर्चा रंगू लागली आहे. सध्या या चर्चेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु या सगळ्यात अजित पवार यांनी बी प्लॅन तयार ठेवल्याचे देखील समोर आले आहे. अजित पवार यांनी आखलेल्या या बी प्लॅनमध्ये ते कांचन कुल यांना शरद पवार गटाच्या विरोधात उभे करण्याची दाट शक्यता आहे.
राष्ट्रवादी पक्षासाठी बारामती हा त्यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लांमध्ये शरद पवारांबरोबर अजित पवार गटाचे देखील तितकेच समर्थक आहेत. सध्या बारामती जिल्ह्याच्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार बाहेर पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गटात घासून लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, शरद पवार गटाला टक्कर देण्यासाठी अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र या सगळ्या सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहिल्यास नणंद भावजय समोरासमोर येतील. त्यामुळे नाते संबंधात दुरावा येण्याची शक्यता. हे सर्व टाळण्यासाठी अजित पवार यांनी कांचन कुल यांचा पर्याय निवडल्याचे सांगितले जात आहे. कांचन कुल भाजपमध्ये असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी देता येणार आहे. यापूर्वी त्यांनी 2019 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली होती. आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या पाठिंबासह कांचन कुल सुप्रिया सुळे यांच्यासह उभा राहण्याची दाट शक्यता आहे.