आरसीबी पुन्हा एकदा अपयशी ; गावस्करांनी विराट बाबत केलं ‘हे’ वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे आयपीएल जिंकण्याचे विराट कोहलीच्या संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीच्या या पराभवानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर आपलं मत व्यक्त करताना विराट कोहली वर निशाणा साधला. कर्णधार विराट कोहलीला फलंदाजी मध्ये यंदा चांगली कामगिरी करता आली नाही हे बँगलोरला ट्रॉफी पटकावता न आल्याचं प्रमुख कारण असल्याचं गावसकर म्हणाले.

विराट कोहलीने स्वत:साठी उच्च स्तर स्थापन करून ठेवला आहे, याची बरोबरी विराटला करता आली नाही. हेच बँगलोरच्या टीमला आयपीएल ट्रॉफी जिंकता न आल्याचं प्रमुख कारण आहे. विराट जेव्हा एबी डिव्हिलियर्ससोबत मोठी खेळी करतो, तेव्हा बँगलोर मोठा स्कोअर करते,’ अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

बॉलिंग कायम बँगलोरची कमकुवत बाजू राहिली आहे. या टीममध्ये फिंचसारखे चांगले टी-20 खेळाडू आहेत, देवदत्त पडिक्कलने चांगली सुरुवात करून दिली, यानंतर विराट आणि एबीदेखील आहेत. त्यामुळे टीमला एक चांगला फिनिशर खेळाडू शोधावा लागेल. शिवम दुबे ही भूमिका बजावू शकतो,’ असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment