मी तुमचे अश्रू स्वीकारतेय..! मोदींच्या अश्रूंना देऊन पदर, कंगनाने घेतली ट्रोलर्सची खबर

0
70
Kangna_PM Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाराणसीतील डॉक्टरांसोबत संवाद परिस्थितीचा आढावा घेत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले असल्याचे अख्ख्या देशातील जनतेने पाहिले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील यंत्रणांसोबत बैठका घेताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा उल्लेख करीत मोदींना गहिवरून आले होते. मात्र यावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या अश्रुंवर जोरदार टीका झाली होती. बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला कार्यक्रम होता, अशी सणसणीत टीका विरोधकांनी केली. सोशल मीडियावरही त्यांच्या या भावुकपणाची जोरदार खिल्ली उडवली गेली. आता यावर भक्त कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. सोबत मोदींच्या भावनाही समजून घेण्याबाबत वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री व भाजप पक्षाशी कट्टर असलेली कंगना रनौत हिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ‘अश्रू खरे होते वा खोटे… तुम्ही टिअर डिटेक्टर टेस्टमध्ये गुंतून राहणार आहात की दुस-याचे दु:ख बघून तळमळणा-या व्यक्तिच्या भावना स्वीकारणार आहात. वेदना असहनीय होतात तेव्हा त्या व्यक्त कराव्याच लागतात. हे दु:ख वाटावेच लागते. मी तुमचे अश्रू स्वीकारतेय… पंतप्रधान मोदीजी मी तुम्हाला तुमचे दु:ख शेअर करू देईन… प्रिय भारतीयांनो प्रत्येक आशीर्वाद समस्या समजू नका. स्वत:चे अ‍ॅटिट्यूट आणि विचार स्वत: ठरवा, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CN1sIUkBRhA/?utm_source=ig_web_copy_link

२१ मे २०२१ रोजी मोदींनी वाराणसीतील डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचा-यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी कोरोनामुळे गमावलेल्या आणि अजूनही गमावू लागणा-या देशातील त्या प्रत्येक व्यक्तीबाबत बोलताना मोदींना त्यांच्या भावना आणि अश्रू अनावर झाले होते.

त्यांचा हा व्हिडीओ इतका जास्त वायरल झाला होता कि बस रे बस. यानंतर लोकांनी मोदींच्या भावना आणि अश्रू .. इतकेच नव्हे तर यासोबत ते स्वतः खोटारडे आहेत असे म्हणत संताप व्यक्त केला होता. याआधी यूपीमध्ये मेंदू ज्वरामुळे हजारो लहानग्यांनी आपला जीव गमवला होता. त्यावर बोलताना मोदींना संसदेत रडू कोसळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here