हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर क्षणोक्षणाची माहिती अपडेट करावी. असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले.
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मजुरांचे स्थलांतर थांबवा असंही म्हटलं आहे. स्थलांतर करणाऱ्या मजूर आणि कामगारांसाठी देशात ठिकठिकाणी शिबिरं आणि निवासाची व्यवस्था करावी. तसंच या कामगारांची समजूत घालण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी प्रशिक्षत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घ्यावे, असं सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुचवलं आहे. याचसोबत स्थलांतरित मजूर आणि कामगारांवर वैद्यकीय उपचाराची सेवा पुरवावी. यासोबतच करोना संसर्गाच्या रुग्णांना मोफत उपचार द्या, असे निर्देश कोर्टाने दिले.
दरम्यान, राज्यातील हायकोर्टात स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील प्रकरणाची सुनावणी होऊ नये ही केंद्राची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. राज्यांमधील स्थानिक हायकोर्ट हे परिस्थिती अधिक बारकाईने समजू शकतात. यामुळे स्थलांतरीत मजुरांसंबंधीच्या प्रकरणांवर त्यांना सुनावणी घेता येईल, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”