नवी मुंबई । बहुमत चाचणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे उद्या महाराष्ट्र विधानसभेवर फ्लोअर टेस्ट घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
Supreme Court gives go ahead to the floor test in the Maharashtra Assembly tomorrow; says we are not staying tomorrow's floor test. pic.twitter.com/neYAIftfWe
— ANI (@ANI) June 29, 2022
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेले ९ दिवस शांत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अखेर सत्तानाट्याच्या अंकात जोरदार एन्ट्री झालेली आहे. फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं, अशी विनंती केली. तर गुवाहाटीला असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदारही उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत येणार असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.