वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

0
77
suprim court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने एका खटल्यावर सुनावणी करताना वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क असणार असल्याचे म्हंटले आहे.

घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्ती संबंधित एका खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जर एखाद्या हिंदू पुरुषाचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या मुलीला त्याने कमविलेली संपत्ती आणि अन्य संपत्ती मिळवू शकते. मुलांपेक्षा या संपत्तीमध्ये मुलींना प्राधान्य असणार आहे.

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी मद्रास न्यायालयाच्या एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तामिळनाडूतील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने हा 51 पानांचा निकाल दिला. या प्रकरणात 1949 मध्ये याचिकाकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी स्वतःच्या आणि विभाजित मालमत्तेसाठी कोणतेही मृत्युपत्र तयार केले नव्हते. वडील संयुक्त कुटुंबात राहत असल्याने मद्रास उच्च न्यायालयाने भावाच्या मुलांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क दिला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या एकुलत्या एक मुलीच्या बाजूने निकाल दिला आहे. मुलीचे वारस हे खटला लढवत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न वनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते.

जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ किंवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे. या प्रकरणात मुलीने वडिलांनी स्वत: कमविलेल्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळविण्यासाठी कोर्टाचा दरवाजा खटखटावला होता. अन्यकायदेशीर वारसाच्या अनुपस्थितीत खंडपीठाने मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा कसा देता येईल यावर सुनावणी घेतली. या प्रकरणी न्यालयाच्यावतीने निर्णय देण्यात आला आहे.

मुलीचे लग्न झाल्यानंतर काय?

या अगोदर मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानले जात होते. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मात्र समान वारसाचे अधिकार देण्यात आलेले नव्हते. मुलीचे लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानले जात नव्हते. मात्र, 2005 मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानले जाऊ लागले. मुलीचे लग्न झाल्यानंतरही मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here