उद्धव ठाकरे V/S एकनाथ शिंदे यांच्यात कोण जिंकणार? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल LIVE

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही बाजूनी सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर १ ऑगस्ट ला पुढील सुनावणी होणार असल्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंगळवार पर्यंत दोन्ही बाजूना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला तर दुसरीकडे हरीश साळवी आणि तुषार मेहता यांनी एकनाथ शिंदे आणि राज्यपालांची बाजू लावून धरली. सुनावणी दरम्यान, शिंदे यांचे वकील अॅड हरीश साळवे यांनी काही कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला. त्यासाठी , त्यांनी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. अखेर कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत १ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

विधिमंडळात गटनेत्याला हटवण हा पक्षातंर्गत विषय आहे, ज्याच्याकडे बहुमत आहे त्याला गटनेता हटवण्याचा अधिकार आहे असे निरीक्षण यावेळी सुप्रीम कोर्टने नोंदवले.तसेच या मुद्द्यांसाठी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे संदर्भ द्यावा लागेल. तोपर्यँत कोणत्याही अपात्रतेच्या अर्जांवर निर्णय घेणार नाहीत. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा सचिवांना सर्व रेकॉर्ड सुरक्षित कोठडीत ठेवण्यास सांगितले आहे.